खामगांव : जिजाऊ ब्रिगेड प्रदेश महासचिव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी व अज्ञात आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी याकरिता आज खामगाव येथील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांतर्फे शहर पोलीस स्टेशन मधे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले आहे.जिजाऊ ब्रिगेड प्रदेश महासचिव शिवमती सारीका लोकरे अंबुरे यांच्या ११ वर्षाच्या मुलावर उमरगा,जि.उस्मानाबाद येथे त्यांच्या राहत्या घरी काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. सारीका लोकरे अंबुरे हे सामाजिक क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व असून दि.१८ जानेवारी २०२१ रोजी त्या आपल्या शासकीय कामावर गेलेल्या असतांना त्यांचा ११ वर्षाचा मुलगा एकटाच घरी होता.ही संधी साधून दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरी प्रवेश केला व त्यांच्या मुलाला धाकधपट करीत आम्ही तुझ्या आईला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली.तसेच घरातील सामानही अस्ताव्यस्त करुन टाकले.त्यामुळे लहान मुलाच्या मनावर त्याचा गंभीर परिणाम झाला असून तो मुलगा मानसिकदृष्ट्या खूप घाबरलेला आहे.सध्या तो दवाखान्यात भरती असून संपूर्ण कुटूंब या हल्ल्याने धास्तावलेले आहे.या अमानुष घटनेचा खामगांव मधील सर्व जिजाऊ ब्रिगेड जाहीर निषेध व हल्लेखोरांना ताबडतोब अटक झाली पाहिजे तसेच त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीचे निवेदन आज जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने खामगांव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना देण्यात आले आहे. त्या आरोपींना अटक करावे अन्यथा जिजाऊ ब्रिगेडला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असून सरकारने अतिशय गांभीर्यपूर्वक या प्रकरणात लक्ष घालावे व हलेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी आम्ही समस्त जिजाऊ बिग्रेडच्या वतीने केले आहे. यावेळी जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हाध्यक्ष रंजना घिवे,सीमा ठाकरे, वनिता अरबट,सुधा भिसे,नंदा निकम, वंदना वानखेडे संगीता वाघ, रजनी देशमुख आदी उपस्थित होते.