पुर्णेचा पुर ओसरला….
जळगाव जा :- (सागर झनके) गेल्या दोन दिवसापासून पूर्णा नदिला पूर असल्यामचळे जळागाव जामोद – नांदुरा मार्ग वाहतुकिसाठी बंद होता.काल संध्याकाळ पासून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने पुलावरून पाणी कमी होण्यास सुरुवात झाली.तर आज सकाळी पुलावरील पाणी ओसरल्याने गत् दोन दिवसापासून वाहतुकीसाठी बंद असलेला जळगाव जामोद – नांदुरा मार्ग आज वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. काल सायंकाळ पासूनच पूर कमी होण्यास सुरुवात झाली होती.त्यामुळे आज सकाळी पुलावरील पाणी कमी झाल्याने टू व्हिलर,फोर व्हिलर तर कुनी पायीच पुलवारून जात आहे.दोन ते तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे पुर्णा नदिच्या पात्रात प्रच़ड वाढ होवून नदिला पूर आला होता.त्यामुळे दोन दिवसापासून जळगाव जामोद नांदुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता.आज नदिचा पूर ओसरल्याने दोन दिवस बंद असलेला पूर्णा नदिचा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.