जळगाव जा : सकाळी पुर्णा नदिला पूर आल्यामुळे माणेगाव येरळीच्या मधोमध असलेल्या पुर्णा नदिला पुर आल्यामुळे सदर पुलावरुन चार ते पाच फूट पाणी असल्यामुळे जळगाव जामोद – नांदुरा मार्ग आज सकाळपासूनच वाहतुकिसाठी बंद करण्यात आला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून बुलढाणा जिल्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तर काही भागात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात नदि नाल्यांना पूर आलेला आहे. पुर्णा नदीच्या उगमस्थानावरही पावसाची संततधार सुरू आहे. लहान मोठी धरणेही पाण्याने तुडुंब भरलेले असल्यामुळे त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदिपात्रात पाण्याची मोठी वाढ होत असून नदिला मोठा पूर आलेला आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पुर्णा नदी दुथडी भरून वाहत असून पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे.
मात्र प्रवाशांना पर्यायी मार्ग म्हणुन माऊली बोठा येथून असल्याने पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जुन्या पुलाच्या बाजुलाच नदिवर मोठा पुल बांधला असून त्याच काम अजुनही अतीशय कासव गतीने सुरू आहे. आजरोजी तो पुल सुरू असता तर प्रवाशांची गैरसोय झाली नसती. सकाळ पासूनच पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पुर पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे.
नदिपुलावर पोलीस व प्रशासनाचे कर्मचारीही त्या ठिकाणी दिसून आले नाही. अशा वेळेस पुलावर एखादा अनुचीत प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण…? पुर्णा नदिच्या पाण्यात अजूनही वाढ होत असून आता पर्यंत पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावी अन्यथा या ठिकाणी अनुचित प्रकार याठिकाणी घडू शकतो.