खामगांव : मागील काही दिवसापासुन शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. पंकज स्वीट किराणा दुकान तसेच लक्ष्मी ट्रेडिंग होलसेल किराणा दुकान फोडून चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच गोविंद नगर मधील रहिवासी जय किसान खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष भागदेवानी काल दुपारच्या सुमारास एचडीएफसी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी त्यांची कार क्र एम एच 28 ए झेड 5425 बँके समोर उभी करून बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.सदर बँकेतून चेक विड्रॉल करून 25 लाख रुपये काढून बाहेर आले व त्यांनी पैसे असलेली बॅग कारमधील मागील सीटवर ठेवली होती.

त्याच वेळी गाडी समोरून अनोळखी व्यक्तिने त्यांना त्यांच्या कारचे ऑइल लिकेज होत आहे असे सांगून त्यांचे लक्ष विचलित करीत त्यांना ऑइल पहा असे म्हटले त्यामुळे आशिष भागदेवानी यांनी कार खाली उतरून बॉनेट उघडून इंजिनची पाहणी करताना गाडीतील मागील सीट वर ठेवलेली 25 लाख रोख रक्कम असलेली बॅग दुसऱ्या चोरट्यांनी गाडीचे ऊजवे गेट उघडून बॅग घेऊन पोबार केला.सदर घटना भागदेवानी यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनेची महिती शहर पोलिस स्टेशन ला देताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी व पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर,ए पी आय रविंद्र लांडे घटनास्थळी दाखल झाले व परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता चोरटे हे दुचाकी वर बसून जाताना दिसून आले.मात्र चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही.तरी या प्रकरणी आशिष भागदेवानी यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम 379, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर करीत आहेत.