खामगांव : येथील जनुना तलावात बर्डे प्लॉट मधील 23 वर्षीय युवक तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. खामगाव बर्डे प्लॉट येथील युवक अर्जुन निगास नाटेकर युवक जनुना तलावात याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे एपीआय धीरज बांडे, नापोका लोणीकर, पोका रविंद्र कन्नर, पोका त्रिशूल ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतकाला बाहेर काढून घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनात पाठवण्यात आले होते. या घटनेने संपुर्ण बर्डे प्लॉट परिसरात शोककळा पसरली आहे.पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.