April 19, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा

चिमुकल्याचा गळफास लागल्याने दुर्देवी मृत्यू

खामगाव – खांबाला रुमाल बांधून त्यासोबत खेळतांना बारा वर्षीय मुलाला गळफास लागला . ही बाब लक्षात येताच त्याला खाली उतरवून वडिलांना बोलावयास गेलेली आई परत आल्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले . तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.ही घटना खामगाव शहरातील मीरा नगरात काल दुपारी ४.३० वाजता घडली.कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने पालकांना मानसिक धक्का बसला आहे .काल १७ मे रोजी दुपारी पूर्वेश वंदेश आवटे ( १२ ) आई संगीतासह घरीच होता .त्यावेळी आईला बाहेर खेळतो असे सांगून तो घराच्या मागे गेला .तेथे त्याने आडव्या लोखंडी पाईपला रुमाल बांधून खेळायला सुरुवात केली.त्यावेळी अचानक गळफास लागला.ही बाब आई संगीताच्या लक्षात आल्याने तिने त्याला खाली काढले.दुपारी प्रचंड ऊन असल्याने तसेच आजुबाजुला कुणी नसल्याने संगीताने त्याचे वडिल वंदेश यांना बोलावण्यासाठी त्यांच्या कामाचे ठिकाण गाठले . वडील घरी आल्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले . मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.पुर्वेश हा मोबाईलवर सतत सक्रिय असायचा त्याला साहसी उपक्रमाची आवड होती.काही तरी नवे करण्याच्या प्रयत्नात तो सतत असायचा.पुर्वेश चे वडील खासगी कंपनीत काम करतात तसेच फावल्या वेळात भाजीपाला व्यवसाय करतात तर आई घरकाम करते. या कुटुंबात पूर्वेश एकटाच होता.तर दोन वर्षापूर्वी या दाम्पत्याला झालेल्या मुलीचेही निधन झाले आहे या घटनेने आई वडील दोघानाही मोठा मानसिक धक्का बसला असून समाजमन हळहळले आहे .

Related posts

माझ भाग्य़ आहे की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करुन माझा वाढदिवस साजरा करीत आहे – ॲड.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

Why Bold Socks Are The ‘Gateway Drug’ To Better Men’s Fashion

admin

कोरोना योद्धांकरीता अभिनव उपक्रम

nirbhid swarajya
error: Content is protected !!