खामगांव : चिखली अर्बन को-ऑपरेटिव बँकेकडून गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांसाठी विशेष वाहन कर्ज योजना अमलात आणली आहे. मागील महिन्याच्या 30 तारखेला बँकेच्या संचालक मंडळाने शेतकऱ्याना वाहन कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता.
बँकेच्या 31 शाखा आहेत त्या सर्व शाखामधे आतापर्यंत 48 अर्ज शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार बँकेने आतापर्यंत 28 अर्ज निकाली काढले असून यापैकी 22 वाहनांची उपलब्धता शेतकऱ्यांना दिली. आज खामगांव मधे या योजनेंतर्गत गारडगाव येथील शेतकरी गणेश सुरेश धनोरकर व रमेश दिनकर खेडकर यांना
आयशर कंपनीच्या ट्रैक्टरची चाबी अध्यक्ष सतीश गुप्त व उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे यांच्या हाताने देण्यात आली. दोघांना चिखली अर्बनने ट्रैक्टर खरेदीसाठी प्रत्येकी पाच लाख रूपये कर्जपुरवठा केला आहे.
कुठलेही हिडन चार्जेस न लावता फक्त 10 टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना हातभार म्हणुन त्या परिस्थितीला समोर ठेवून बँकेने फक्त 10 टक्के वर कर्ज उपलब्ध करुन दिले आहे.काही शेतकऱ्यांना हार्वेस्टर ची सुद्धा गरज असते त्याकारिता सुद्धा चिखली अर्बन बँकेने कर्ज दिले आहेत.अगदी कमी कागदपत्रांच्या आधारावर पूर्ण सिक्युरिटी सहित कर्ज वाटप चिखली अर्बन बँकेने केले आहे. आम्ही या पैशाचे मालक नसून विश्वस्त आहोत बँकेच्या प्रशासकीय खर्च कमी असल्यामुळे कर्जपुरवठा करणे बँकेला सोपे जात असते असे चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी निर्भीड स्वराज्य शी बोलताना सांगितले.
यावेळी खामगांव शाखेचे शाखा सल्लागार संकल्प गुप्ता, राजेश झापर्डे, शाखाधिकारी कृष्णकुमार पांडे सुनिल देशमुख,दिनेश सिसोदिया,नवनीत फुंडकर, सुदेश पुरवार,रवी कांडलकर,अर्जुन खंडारे, शालीग्राम सोळंके आदी उपस्थित होते.