April 18, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

चारचाकी वाहनाचा अपघात ३ जखमी ; १ मृत्यु

खामगाव : येथून जवळ असलेल्या जयपुर लांडे फाट्या जवळ चारचाकी गाडीचा अपघात होऊन ३ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यु झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील येथून जवळच असलेल्या जयपुर लांडे फाट्याजवळ चार चाकी वाहनाचे संतुलन सोडून गाडी लिंबाच्या झाडाला धडकून अपघात झाला. ही घटना सायंकाळी ६:३० च्या सुमारास घडली आहे. नांदुरा येथे एचडीएफसी बँकेमध्ये मॅनेजर पदावर असलेले संदीप विठ्ठलराव काळे वय ३६ रा.वाशिम हे आपल्या सहकार्‍यांसोबत आपल्या चारचाकी गाडी क्र.एमएच-३७-व्ही-१८२२ याने शेगाव येथे दर्शनासाठी जात असताना जयपुर लांडे फाट्याजवळ गाडीचे संतुलन सुटून गाडी निबाच्या झाडाला जाऊन जोरदार धडकली. या अपघातात संदीप काळे वय ३६ रा. वाशिम, शिवाजी क्षीरसागर वय २७, प्रविण धामोडकर वय २६ हे तिघे जखमी झाले असून विठ्ठल म्हेसरे याचा जागीच मृत्यु झाला आहे. गाडीची धडक इतकी जोरदार होती कि, गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटया घेऊन गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेले नागरिकांनी तात्काळ जखमींना येथील सामान्य रुग्णालयात भरती केले आहे.

Related posts

देवेंद्र देशमुख यांनी दिली निराधार भिका मामांना दृष्टी

nirbhid swarajya

रेल्वेमधे चोरी झाल्यास जबाबदार रेल्वेच; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!

nirbhid swarajya

अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा….

nirbhid swarajya
error: Content is protected !!