खामगांव : सध्या कोविड-१९ कोरोना या विषाणूचा प्रार्दुभाव जगभरात वाढत आहे.२३ मार्च २०२० पासून महाराष्ट्र शासनाने लाॅकडाउन घोषीत केले असून सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुर, कामगार यांच्यासह समाजातील इतर घटकांवर फार मोठे संकट आले आहे. त्यात अवकाळी पाउस, धान्याला भाव नाही व रोजगार नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मेटाकुटीस आला आहे.२५ मे रोजी हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीचे औचित्य साधून मातोश्री स्व.सुलोचनादेवी गोकुलचंदजी सानंदा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खामगांव मतदार संघातील ग्राम घाटपुरी येथे ५ हजार व्यक्तींना निःशुल्क धान्य वाटपाचा रविवार १७ मे रोजी सकाळी ९ वाजता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. तरी ग्राम घाटपुरी येथील एपील, बीपीएल,शेतकरी योजना व अंत्योदय योजनेमध्ये नाव समाविष्ट असलेल्या राशन कार्ड धारक नागरिकांनी पोस्टमन काॅलनी,घाटपुरी येथे उपस्थित राहुन निःशुल्क धान्य वाटप उपक्रमाचा लाभ घेउन सेवेची संधी द्यावी असे आवाहन काॅंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
previous post