खामगाव-: ग्रामपंचायत स्तरावर नियमित डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत असलेल्या ग्रामपंचायत मधील संगणक परिचालकांचे चार महिन्यांपासून व काही संगणक परीचालकाचे एक वर्षापासून मानधन जमा न झाल्याने संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फेब्रुवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या तीन महिन्याचे तर काहींचे मागील वर्षापासून मानधन जमा झालेले नाही. प्रशासनाकडून त्याबाबतीत कसल्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही. उलट नवीन कामांचा ताण संगणक परिचालकांवर लादला जात असल्यामुळे संगणक परिचालक त्रस्त झाले आहेत .
जिल्ह्यातील केंद्र चालकांना त्यांच्या केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे . ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्रात कार्यरत संगणक परिचालकांनी मागील वित्त वर्षात ग्रामपंचायतीचे संपूर्ण ऑनलाइन ऑफलाइन कामे पूर्ण केली आहेत.मागील 2021-22 वित्त वर्ष संपून आता नवीन 2022-23 वित्त वर्ष चालू झाले आहे.मानधन लवकरात लवकर करण्यात यावे असे संगणक परीचालकांचे म्हणणे आहे.