शेगाव तालुक्यातील जलंब ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील घटना.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जलंब ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकी साठी आज मतदान होत असताना जलंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झालीये , यात चार जण गंभीर जखमी झालीत ज्यांच्यावर शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या एकाला अकोला येथे हलविण्यात आले आहे.जलंब येथे आज सकाळपासून ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी मतदान सुरू असताना दोन गटात सुरुवातीला बोलचाल झाली व नंतर अचानक एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केल्याने तुंबळ हाणामारी झाली. या भांडणांमध्ये लोखंडी पाइप व भल्यांचा वापर करण्यात आल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. गावात पोलीसांनी मोठा बंदोबस्त लावला असून मतदान सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.