April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी बातम्या बुलडाणा

गोडाऊन मधून 20 क्विंटल मूग लंपास

खामगाव:- स्थानिक विकमशी चौकातील गोडाऊन मधून 20 क्विंटल मुंग लंपास झाल्याची घटना 4 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते अमित गोविंद बजाज राहणार जसवंत नगर यांचे विकमशी चौकातील गोडाऊन आहे,

सदर गोडाऊन 3 सप्टेंबर च्या रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने शटर चे कुलूप तोडून गोडाऊन मधील 20 क्विंटल मूग किंमत अंदाजे 60 हजार चोरून नेल्याची घटना 4 सप्टेंबर च्या सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत बजाज यांनी शहर पोस्टेला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध कलम 461, 380 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पुढील तपासशहर पोलीस स्टेशन चे पोहेकॉ गजानन बोरसे हे करीत आहे.

Related posts

Gadgets | Would You Strap On A VR Headset For Hours?

admin

बुलडाणा शहरात ऑन ड्यूटी पोलिस कर्मचार्‍याला मारहाण

nirbhid swarajya

शिवसेनेचा चिखली येथे शेतकरी मेळावा उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

nirbhid swarajya
error: Content is protected !!