खामगाव: शहरी भागातील विद्यार्थ्यांन बरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा एकाच ठिकाणी उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रा रामकृष्णजी गुंजकर सरांनी आवार येथे गुंजकर एज्युकेशन हब स्थापन करून विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षणाची संधी.नर्सरी ते पदवी पर्यंत आवार येथील गुंजकर एज्युकेशन हब.मध्ये उपलब्ध करून दिली आहे आज याठिकाणी 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा.करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष गुंजकर कोचिंग क्लासेस खामगाव तसेच गुंजकर एज्युकेशन हब आवार मा प्रा रामकृष्णजी गुंजकर सर तर सचिव प्रा सौ सुरेखाताई रामकृष्णजी गुंजकर.प्रमुख उपस्थिती म्हणून ब्रँच इंजिनीरिंग इरिगेशन डिपार्टमेंट मा श्री दत्तात्रयजी टाले सर,माजी तहसीलदार मा श्री रामदासजी जाधव सर,सौ रंजनाताई राऊत,संदीपजी खराबे,चंद्रशेखरजी ठाकरे,सुदामभाऊ खोटरे,पुंडकर भाऊ,भगवान लाहुडकार,प्रिन्सिपॉल मा प्रा सतिशजी रायबोले सर,मुख्याध्यापिका मा सौ अपर्णाताई राजेशजी बनकर, उपमुख्याध्यापक मा अल्हाट सर,सर्वप्रथम ध्वजारोहण.मा प्रा रामकृष्णजी गुंजकर सर.यांच्या हस्ते करण्यात आले,व संविधानाचे वाचन करण्यात आले,नंतर शासनाच्या निर्देशानुसार तंबाखूमुक्त शपथ.घेण्यात आली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक.करतांना.प्रा कु शरयू कुलकर्णी.यांनी गुंजकर एज्युकेशन हब चा शैक्षणिक क्षेत्रातील.मुख्य उद्देश व शहरी भागातील विद्यार्थ्यांन बरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना.सुद्धा कशाप्रकारे दर्जेदार व उत्तम शिक्षण देण्याचं.काम मागील बऱ्याच वर्षांपासून गुंजकर सरांच्या क्लासेसच्या माध्यमातून व आता जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स.व यानंतर गुंजकर सिनियर कॉलेज.च्या माध्यमातून होईल याची माहिती दिली,तेव्हा इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी भाषण व देशभक्तीपर गीतं सादर केली ,कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मा श्री दत्तात्रयजी टाले सर.यांनी प्रजासत्ताक दिवसाच महत्त्व विद्यार्थ्यांना बोलतांना सांगितलं व आपण एवढ्या सर्वच शैक्षणिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या शाळेत शिक्षण घेत आहोत.शिक्षण घेत असतांना आपण जास्तीत जास्त यश संपादन करून.आपल्या पालकांचे आपल्याप्रति असणारे स्वप्न कसे पुर्ण करू याकडे लक्ष दिले पाहिजे,माजी तहसीलदार मा श्री रामदासजी जाधव सर यांनी प्रजासत्ताक दिनाची.माहिती देत आपण ड्युटीवर कार्यरत असतांना कशाप्रकारे काम केलं,भविष्यात आपण तहसीलदार, जिल्हाधिकारी.झाल्यानंतर कशाप्रकारे लोकांची कामे चांगल्या प्रकारे मार्गी लावू शकतो.याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या,अध्यक्षीय भाषणात बोलतांना प्रा रामकृष्णजी गुंजकर सर यांनी प्रजासत्ताक म्हणजे काय व त्याच महत्त्व,आपल्या देशातील तीन राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी,महात्मा गांधीजी यांची जयंती याच महत्व बोलतांना सांगितलं, तंबाखू,गुटखा यासारख्या वेसनाचे वाईट परिणाम,अशा वेसनापासून आपण दुर राहिले पाहिजे याकरिता युवा पिढीने पुढाकार घेणे आजच्या युगात गरजेचे आहे,आपले मित्र वाम मार्गाने जात असतील तर आपण त्याला रोखले पाहिजे, आपल्याला काहीच दिवसा पूर्वी सिनियर कॉलेज ची मान्यता मिळाली आहे लवकरच गुंजकर एज्युकेशन हब मध्ये सिनियर कॉलेज लॉन्च केलं जाईल, IPS, IAS, SP।यासारखे अधिकारी येणाऱ्या काही वर्षात आपल्या कॉलेज मधून घडतील,युनिक अकॅडमी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषय शिक्षण विद्यार्थ्यांना गुंजकर एज्युकेशन हब च्या माध्यमातून आवार येथे दिले जाईल, त्याकरिता येणाऱ्या काही दिवसात विदर्भातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाची निर्मिती आपल्या कॅम्पस मध्ये कशी करता येईल याचा सुद्धा विचार चालू आहे,शिक्षण घेतांना आपल्या पालकांची व त्यांच्या कष्टाची जाण ठेवा,यानंतर इमारतीच्या नवीन हॉल मध्ये आपल्या शाळेत प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांचे दिबेट कॉम्पिटेशन घेतले जाईल त्यांना त्यांचे वर्गशिक्षक विषय देतील पुढील महिन्यापासून त्याची सुरुवात केली जाईल , आपल्या गावचं नाव आपण शैक्षणिक क्षेत्रात जास्तीत जास्त कष्ट करून कशाप्रकारे उज्वल करू,व कोविड मुळे झालेलं शैक्षणिक नुकसान कसं भरून काढता येईल याची माहिती बोलतांना दिली व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या,यावेळी सूत्रसंचालन इयत्ता 10 वी च्या विद्यार्थी कु गौरी टिकार व कु श्रेया मांजरे यानी केले तर आभार प्रदर्शन कु अंकिता कवडकार हीने केले. व कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम्।या गीताने झाली.