खामगांव: खामगांव पंचायत समितीव्दारा आज दि. आज २४ मे रोजी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली खामगांव तालुक्याची कोरोना महामारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलतांना आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी तालुक्यातील गावांमध्ये कोरोना रुग्णांचे विलगीकरण करण्यासाठी शाळांमध्ये विलगीकरण केंद्र करण्यात यावे, यासोबत ज्याप्रमाणे गाव स्व़च्छता,डास मुक्ती अभियान राबविल्या जाते त्याप्रमाणे प्रत्येक गावात कोरोना मुक्ती अभियान राबविण्यात यावे. लोकांमध्ये कोरोना पॉझेटीव्ह़ रुग्णांना ग्रामीण भागात होम आसोलेशन ऐवजी गावांतील शाळांमध्ये नव्याने सुरु करण्यात येणार विलगीकरण केंद्रात ठेवण्यात यावे, जेणे करुन त्या लोकांचे घरातील वयस्क़र व्यक्ती व लहान मुलांना कोरोना होणार नाही. यापुढे आमदार आकाश फुंडकर म्हणाले की, पहिल्या लाटेमध्ये ग्रामीण भागाने नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे कोरोना ग्रामीण भागात पोहचला नाही परंतु यावेळी ग्रामीण भागात देखील कोरोना पोहचला असून अनेक तरुण व परिचितांचा यात मृत्यु झाल्याचे आपल्या लक्षात येईल्.

कोरोना हा सर्वांना होतो, तो कोणता धर्म, पंथ, पक्ष पाहत नाही त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळा व स्व़त: सुरक्षीत रहा व परिवाराला सुरक्षीत करा. अनावश्यक़ कामासाठी गांव सोडू नका, घरी रहा किंवा शेतात रहा, पण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. आपल्या प्रत्येकाचे जीवन अमुल्य़ आहे. ज्यांना कोरोनाचे लक्षण असतील त्यांनी तात्काळ तपासणी करुन घ्या ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांचे लक्षण असलेल्यांची संख्या जास्त़ असेल अशा ठिकाणी रुग्ण तपासणी कॅम्प़ घेता येईल्. आता प्रत्येक गावांत सर्वेक्षण, तपासणी व पॉझेटीव रुग्णांचे विलगीकरण हे अभियान गांव स्तरावर राबविण्यात येत आहे. सर्वांनी आपले भेद बाजूला ठेऊन प्रशासनांच्या आदेशांचे काटेकोर पालन करा. तसेच सर्व संरपंच व ग्रामपंचायत सदस्य़, ग्रामसेवक यांनी विशेष अभियान राबवून कोरोना बददल जनजागृती करावी. तसेच लसीकरण करुन घेऊन गांव कोरोनापासून सुरक्षीत करावे. कोरोना लसीकरणाचा दर अत्यंत अल्प असून 229000 लोकसंख्येच्या तालुक्यात केवळ 20000 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही खेदाची व चिंतनीय बाब आहे. त्यामुळे येत्या काळात लसी उपलब्ध झाल्याबरोबर सर्व गावकऱ्यांनी लस घेऊन स्वत:ला व कुटूंबाला सुरक्षीत करावे. कोरोना संक्रमण काळात चांगले कार्य करणाऱ्या गावांना पुरस्कृत करण्यात येईल यात फ्रंट लाईन वर्कर सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, इत्यांदीचा पंचायत समिती मार्फत सन्मान करण्यात येईल् त्यामुळे आपल्या गावातील लोकांना सुरक्षीत करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आदर्श निर्माण करत सर्वांत आधी आपले गांव कोरोना मुक्त़ कसे होईल याचा प्रयत्ऩ करावा. या गुगल मिटींगमध्ये पंचायत समिती बीडीओ राजपुत, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य़, सरपंच, ग्रामपंचाय सदस्य़, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.