खामगाव: बुलढाणा जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात कार्यरत असणार्या ग्रामसेवक यांचे २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर केले आहेत.या पुरस्काराचे लवकरच समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री दिलीप विसपुते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजू सु लोखंडे यांनी या आदर्श पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे.पंचायत समिती खामगाव अंतर्गत घाटपुरी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक योगेश इंगळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार साठी निवड
कु.सविता साहेबराव सोनुने ग्रामसेवक-ता बुलडाणा,विजय शालीग्राम शेळके ग्रामसेवक-ता चिखली,अनंत राजेश्वर चेके ग्रामसेवक-ता दे. राजा,अरूण भिमराव नागरे ग्रामसेवक-ता सिं.राजा ,अनंत पृथ्वीराज आघाव.ग्रामसेवक-ता लोणार,शिवप्रसाद भगवान मवाळ ग्रामसेवक-ता मेहकर,योगेश जिवन इंगळे ग्रामसेवक-खामगाव,अनिल पी बिचकुले ग्रामसेवक-शेगाव,प्रकाश नारायण चाटे ग्रामसेवक-संगमपुर,गोपाल महादेव तिवाले ग्रामसेवक-जळगाव जामोद,कु अनाराधा सुभाष आढाव ग्रामसेवक-नांदुरा,राजु सीताराम बगे ग्रामसेवक-मलकापूर,राजेंद्र अरूण वैराळकर ग्रामसेवक-मोताळा.