खामगाव : येथील हंस कॉटन भागात असलेल्या नीलम ट्रान्सपोर्ट मध्ये आज चारचाकी वाहनाने गुटखा येणार असल्याची माहिती शहर पोलिसांच्या डीपी पथकाला मिळाली होती. या डीबी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक आज हंस कॉटन मध्ये असलेल्या नीलम ट्रान्सपोर्ट मधे गेले असता त्या ठिकाणी एम एच-१९ झेड-४२७९ नंबरच्या आयशर
https://www.facebook.com/watch/?v=377301383723111
मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व शरीरास अपायकारक असलेला गुटखा सदर गाडीमध्ये मिळून आला. यामध्ये राज निवास गुटख्याच्या पोतडया व आयशर चारचाकी वाहन असे ४० लाख रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. वृत्त लिहेपर्यंत पुढील कारवाई सुरु होती.