खामगांव : जगतिक आदिवासी दिना निमित्त महानायक आद्य क्रांतिविर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मान्यवरांची व आदिवासी बाधवांची उपस्थिती होती.दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. हा दिवस संपूर्णपणे जगातील आदिवासींना समर्पित आहे. डिसेंबर १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जावा. असे जाहीर केले होते. १९८२ मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणावरील आयोगाच्या मूळ निवासी लोकसंख्येवरील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यगटाच्या बैठकीचा पहिला दिवस असल्याने ९ ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली होती. त्यानुसार जगातील आदिवासी लोकांच्या हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण संरक्षणासारख्या जागतिक समस्यांमध्ये आदिवासी लोकांचे योगदान ओळखणे, आदिवासींचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्यासमोरील समस्या व आव्हाने ओळखण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यामुळे देशभरात सर्व ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त महानायक आद्य क्रांतिविर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी विनोद भोकरे, रावसाहेब पाटील, अंबादास पाटील, प्रकाश हेंड पाटील, अमोल बिचारे, मिर्झा अकरम बेग, मोहन खताळ, उमेश गोधणे, शेख फारुख, आनंद बाप्पु देशमुख, इसरार मिथाणी, लक्ष्मण वानखडे, शेख सादिक यांच्या सह अनेक मान्यवर , समाज बांधव उपस्थित होते.