मिशन परिवर्तन नशा मुक्त बुलढाणा विशेष उपक्रमा अंतर्गत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव पोलीस विभागातर्फे अंमली पदार्थ व ड्रग्ज विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये तरुण पिढीला व्यसनमुक्ती संदेश देणे, अंमली पदार्थाच्या बेडक्यातून मुक्त होण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि समाजात आरोग्यदायी जीवनशैलीच्या प्रसार करणे हा उद्देश्य असून व्यसनमुक्त समाज आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी ही रॅली काढण्यात यामध्ये पोलीस विभागातील पोलीस
अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी व मोठ्या संकेत सहभागी झाले होते. रॅली दरम्यान जनजागृती पर घोषणा देऊन व्यसनमुक्तीचा संदेश या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविला आहे. सदर रॅली महात्मा गांधी उद्यान येथे व्यसनमुक्तीची शपथ घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे.अशी माहिती रामकृष्ण पवार,पोलीस निरीक्षक खामगाव शहर पोलीस स्टेशन यांनी दिली आहे