November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई सामाजिक

खामगावात सोमवारी सिटी स्कॅन एमआरआय व रिसर्च सेंटरचे उद्घाटन

आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांची उपस्थिती

खामगांव : स्थानिक गोकुळ नगर खामगाव सिल्वर सिटी हॉस्पिटल च्या बाजूला अद्यावत सिटी स्कॅन एमआरआय व रिसर्च सेंटर चा उद्घाटन समारंभ सोमवार १६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जगातील सर्वोत्तम कंपनीच्या अत्याधुनिक, मशिनरी प्रथमच खामगाव सारख्या शहरात उपलब्ध होत आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे राहणार आहेत तर मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे व खासदार प्रतापराव जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे.

सदर कार्यक्रमास माजी मंत्री तथा जळगाव जामोद मतदारसंघाचे आ. संजय कुटे, आ.आकाश फुंडकर, आ.संजय गायकवाड, आ. श्वेताताई महाले, आ. राजेश एकडे, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्षा सौ.अनिता डवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस ,वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माऊली ग्रुपचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील, कुबेर ग्रुपचेअरमन गौतम मुनोत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे सेवेत रुजू होणार्‍या सिटीस्कॅन ९६ स्लाईस व एमआरआय ९६ चैनल सुपरफास्ट डिजिटल १.५ मशिनरी आहे. यामध्ये एमआरआय तपासणी केवळ दहा मिनिटात प्राप्त होणार असून तपासणी दरम्यान या मशीन चा आवाज सुद्धा अत्यंत कमी येत असल्याचे सांगितले आहे.

मेंदू किंवा इतर ठिकाणच्या रक्तवाहिन्यांची ऍन्जिओग्राफी कॉन्ट्रास्ट न देता करता येते त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट चे दुष्परिणाम होत नाही. मेंदूपासून संपूर्ण मणक्याची तपासणी एकाच फील्डमध्ये करता येते. तर सिटीस्कॅन मशिन ही मध्य भारतातील प्रथम व संपूर्ण भारतातील दुसऱ्या प्रकारची अत्याधुनिक मशीन आहे. ही मशीन केवळ दहा ते बारा सेकंदात एचआरसिटी करते त्यामुळे फार कमी रेडिएशनला रुग्णांना सामोरे जावे लागते. श्वासोश्वास न रोखता सुद्धा या मशीनद्वारे सिटी स्कॅन करता येते हे विशेष…. त्यामुळे खामगाव शहर व तालुक्यातील रुग्णांना आता एचआरसिटी व सिटीस्कॅन करण्याकरिता अकोला, अमरावती,नागपूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची डोकेदुखी वाचणार हे नक्की..

Related posts

कोरोनाच्या तिस-या लाटीच्या पार्श्वभूमीवर आ. फुंडकर यांनी घेतली आढावा बैठक

nirbhid swarajya

शेतकरी कायद्या विरोधात विधेयक जाळुन काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

nirbhid swarajya

चक्क डॉक्टरने दिली ऑडिओ क्लीप व्हायरल करून पत्रकारांना धमकी

nirbhid swarajya
error: Content is protected !!