खामगाव : सध्या महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे व या च पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. मात्र या काळात पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, सर्व अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अश्याच पोलीस प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांची काळजी घेण्याचे कार्य शहरातील काही सामाजिक जाणिव असणारे प्रतिष्ठित नागरिक करीत आहेत. यांच्यातर्फे लॉकडाऊन दरम्यान शहरात ऑनड्यूटी असणारे पोलीस बांधव, नगर परिषद तसेच तहसील विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांना दररोज वेळोवेळी चहा, बिस्कीट व नाश्ता दिला जातो. सोबतच वारंवार हात निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर देखील देण्यात येते. याप्रमाणेच निराधारांनाही चहा-नाश्ता देण्यात येतो. या मध्ये नरेंद्र मावळे, रवी आनंदे, लक्ष्मण आयलानी, गोपाल गोहेल, संजय शर्मा, रवि जोशी, जितेंद्रसिंह मेहरा, गोपाल खंडेलवाल हे मागील काही दिवसांपासून अविरतपणे कार्य करत आहेत.