ग्रा.पं.विकासासाठी आघाडी सरकारकडून निधी कमी पडू देणार नाही- मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
खामगांव:- खामगांव तालुक्यातील ७१ ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम मा.जिल्हाधिकारी यांनी घोशीत केलेला असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात दि.०९ फेब्रुवारी २०२१ रोजी खामगांव तालुक्यातील २४ ग्राम पंचायतीमध्ये सरपंच,उपसरपंच पदाकरीता निवडणुक पार पडली. खामगांव मतदार संघामध्ये पहिल्या टप्पयात सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणूकीत काॅंग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला राहिला असून काॅंग्रेसने सर्वाधिक १६ जागांवर विजय मिळविला आहे तर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. खामगांव तालुक्यातील ७१ ग्राम पंचायतीपैकी पहिल्या टप्प्यात म्हणजे दि.०९ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या निवडणूकीत खामगांव तालुक्यातील अडगांव,भंडारी, गणेशपूर,गोंधनापूर,आंबेटाकळी, हिवरा बु., ज्ञानगंगापूर या ग्राम पंचायतीवर तर खामगांव मतदार संघात समावेष असलेल्या षेगांव तालुक्यातील बेलुरा,भास्तन,भोनगांव,डोलारखेड, गौलखेड, जलंब, जानोरी, खेर्डा या ग्राम पंचायतीवर काॅंग्रेसचे सरपंच व उपसरपंच विजयी झाले आहे. दि.०९ फेब्रुवारी रोजी जनसंपर्क कार्यालय येथे गोंधनापूर येथील नवनिर्वाचित सरपंच मधुकर नथ्थुजी वेरुळकर, उपसरपंच मो.नदीम, भोनगांव येथील नवनिर्वाचित सरपंच मनकर्णा समाधान मोरखडे, उपसरपंच वैभव गजानन पातुर्डे, हिवरा बु.गट ग्राम पंचायतमधील नवनिर्वाचित सरपंचा सौ.दिक्षा अरविंद हेलोडे, उपसरपंच षैलेष देविदास इंगळे यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते तिरंगा दुपटट्ा व पुश्पहार घालुन सत्कार करण्यात आला व पेढा भरवुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये ग्रामस्थांनी काॅंग्रेस पक्षावर जो विष्वास दाखविला तो विष्वास सर्वांनी सार्थ ठरवावा, एकसंघ राहुन गावाच्या विकासासाठी संकल्पबध्द व्हावे, ग्राम पंचायतच्या विकासासाठी आघाडी सरकारकडून निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी खामागंव तालुकाध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार,षेगांव काॅंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विजय काटोले ,नगरसेवक अब्दुल रषीद अब्दुल लतीफ, नगरसेवक किशोरआप्पा भोसले,माजी जि.प.सदस्य गजानन वाकुडकर,एनएसयुआयचे शहर अध्यक्ष रोहित राजपूत, युवक काॅंग्रेस जिल्हा महासचिव तुषार चंदेल,न.प.चे माजी उपाध्यक्ष संतोश देषमुख यांच्यासह नवनियुक्त ग्राम पंचायत सदस्य, काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. बुधवार दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी दुसऱ्या टप्प्यातील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये हिंगणा कारेगांव,हिवरखेड, जनुना,जळका भडंग, कदमापूर,कंचनपूर,कंझारा, काळेगाव,कारेगांव बु., कुंबेफळ, कोलोरी, खोलखेड, लाखनवाडा बु., लाखनवाडा खु., लांजुळ, मांडका, निमकवळा,निपाणा,निरोड, पाळा, पळषी खुर्द, पारखेड,पातोंडा,पिंपळगांव राजा या ग्राम पंचायतीचा समावेश आहे.