April 11, 2025
खामगाव

खामगांव पोलिसांनी पकडला मुद्देमालासह १७ लाखाचा गुटखा

खामगांव : देशभरात लॉकडाऊन असतांना सुध्दा अवैध व्यावसायीक विविध मार्गाने प्रतिबंधीत असलेल्या गुटख्या वाहतुक लपून छपून करीतच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव एसडीपीओ प्रदिप पाटील यांच्या पथकाने धान्याची वाहतुक करणाऱ्या ४०७ या वाहनातून अमरावती येथून चिखली येथे नेण्यात येणारा १२ लाख रूपयांचा गुटखा अकोला रोड बायपास जवळील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ सकाळी ४.३० वाजे दरम्यान पकडला असून यामुळे अवैध गुटखा व्यवसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन असतांना सुध्दा सदर वाहन हे विनातपासणी करता अमरावती येथून खामगांव पर्यंत कसे आले ? याबाबत अनेक शंकाकुशंकांना उधाण आले आहे. एसडीपीओ प्रदिप पाटील यांच्या पथकाला विशेष खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आली असून या प्रकरणी वाहन चालक शे. आबीद शे. हसन, रा. चिखली व निसार हाजी रा चिखली यांच्या विरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आबीद शे. हसन, रा चिखली याला अटक करण्यात आली असून वाहन जप्त करण्यात आले आहे.गुटखा व वाहनास ऐकून १७ लाखाचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला आहे मागील ३ महिन्यांपासुन दर १५ दिवसांनी सदर गुटख्याची वाहतुक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

एकीकडे कोरोनामुळे जिल्हाबंदी करण्यात आली आहे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोणतेही वाहन असो ते चेक करण्यात येत आहे. अश्या परिस्थितित दर १५ दिवसांनी गुटख्याची वाहतुक होतेच कशी ? हा प्रश्न सुद्धा येथे उपस्थित होतो हि कारवाही सुधाकर थोरात, देवेंद्र शेळके, प्रदिप मोटे, रविंद्र कन्नर यांचा समावेश आहे.धान्याच्या आड अवैध वाहतुक करणाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले आहे या पुढे हि अशा करवाह्या सुरूच राहणार असल्याचे प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव यांनी सांगितले आहे.

Related posts

भेंडवळची घटमांडणी जाहीर….

nirbhid swarajya

दुचाकीची टाटा पिकपला मागून जोरदार धडक ; २ जण गंभीर जखमी

nirbhid swarajya

जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव नॉट रिचेबल……

nirbhid swarajya
error: Content is protected !!