बुलडाणा : जिल्ह्यात आज १७ आणि १८ तारखेला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा हवाला देत दोन दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता. विदर्भात प्रामुख्याने हा अवकाळी पाऊस पडणार असून, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा हा पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली होती.. प्रामुख्याने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. फार जोरदार नसला, तरी मध्यम ते हलक्या स्वरूपाच हा पाऊस राहणार असल्याचे जिल्हा कृषी हवामान केद्रातील तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी सांगितले होते. दुसरीकडे अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी त्यांची शेतात परिपक्व झालेली तूर काढली असेल, तर ती सुरक्षीत स्थळी हलवावी, तसेच लवकर पेरलेला हरभरा काढणीस आला असल्यास किंवा काढला असल्यास तोही पावसापासूनच्या बचावासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राने केले होते. दुसरीकडे हवामान खात्याने दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला असला, तरी १४ फेब्रुवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून आले. आज सकाळी ७ वाजताच्या दरम्यान खामगांव परिसरात तुरळक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील मलकापुर येथे सुद्धा काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर अवकाळी पावसामुळे धान खरेदी केंद्रावर उड्यावर असलेल्या धानाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान बुलडाण्यात जिल्हा कृषी हवामान केंद्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाले असून, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १८ हजार शेतकऱ्यांना आता नियमित स्वरूपात आठवड्यातून दोन दिवस हवामानाचा अंदाज व पिकांसंदर्भात एसएमएसद्वारे मार्गदर्शन करण्यात येते.अवकाळी पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यानी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले होते.
previous post
next post