खामगाव : खामगावमध्ये लव्ह जिहादचा प्रकार आज समोर आला असून, एका भामट्याने स्वतःचे नाव खोटे सांगून एका मुलीशी अनुसूचित जाती संस्कृतीप्रमाणे लग्न केले. तसेच तिला मुलगा- मुलगी अशी अपत्य होऊ दिली आणि तिला सोडून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार खामगावच्या दालफैल भागात बाबुराव बावणे राहतो. त्याच्याकडे 2006 साली शफीक सुलतान सय्यद (मूळ रा. अतार गल्ली, दर्ग्याच्या बाजूला, जिंतूर जि. परभणी) हा कामाला होता. कामाच्या ठिकाणीही त्याने स्वतःची ओळख सांगताना तो अनुसूचित जातीचा आहे. त्याचे नाव संतोष तुकाराम मोरे असून, भावाचे नाव अनिल तुकाराम मोरे आहे. त्यांचा आकाश पाळण्याचा व्यवसाय आहे, असे सांगितले होते. बाबुरावच्याच ओळखीने त्याने शंकरनगर येथील गरीब कुटुंबातील एका मुलीच्या कुटुंबियांकडे लग्नासाठी मागणी घातली. मुलगी दिल्यास सुखात राहील, सांगून बाबुरावनेही त्याला साथ दिली. त्यामुळे या गरीब कुटुंबातील मुलीशी 2006 साली अनुसूचित जाती संस्कृतीप्रमाणे साध्या पद्धतीने दोघांचे लग्न लागले. त्यानंतर त्यांना मुलगा, मुलगी झाली. ते दोघे खामगाव येथेच वास्तव्यास राहू लागले. मात्र ती संसार करत असतानाच 9- 10 वर्षांनी संतोषने बाहेरगावी कामासाठी जातो, असे सांगून पळ काढला. तो नंतर परतलाच नाही. विवाहितेने बाबूरावकडे संतोषबाबात विचारपूस केली असता त्यानेही तो येईल, संयम ठेव, असे म्हणून टोलवाटोलवी केली. गेली 4- 5 वर्षे ही दिशाभूल सुरू होती. अखेर विवाहितेचा संयम संपला. तिने सुगावा लावायचाच याच उद्देशाने बाबुरावला खडसावून विचारले. तेव्हा याच महिन्यात त्याने संतोष ऊर्फ शफीकचा जिंतूरचा खरा पत्ता दिला. विवाहिता जिंतूरला गेली असता शफीक सुलतान सय्यद याने मी तो नव्हेच, असा पवित्रा घेतला. माझा तुमच्याशी काहीही संबध नाही, असे सांगितले. त्याच्या घरच्यांनीही विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देऊनही येथून निघून जाण्यास सांगितले. चार-पाच वर्षे त्याचा पत्ता नव्हता. विवाहितेने त्याच्याशी संपर्क करण्याचे हरतर्हेने प्रयत्न केले. पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर विवाहितेने रौद्ररुप धारण करत तो जिथे कामाला होता त्याच्याकडून पतीचा मूळ पत्ता काढला आणि जिंतूरमध्ये जाऊन शोध घेतला. पण त्याने तो मी नव्हेच, असा पवित्रा घेतला असून, संतोष मोरे कोण ? मी तर शफीक सुलतान सय्यद असे म्हणून त्याने स्वतःची ओळखच पुसून टाकली आहे. ज्याने सात वर्षे पत्नी म्हणून शोषण केले, त्याच्यापासून दोन अपत्ये झाली आता तोच ओळखही दाखवत नसल्याने हताश पीडितेने त्यामुळे घाबरलेल्या विवाहितेने खामगाव येथे अॅड. मीरा बावसकर यांची भेट घेतली आणि शहर पोलीस स्टेशनला जाऊन तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शफीक सुलतान सय्यद (40, रा. जिंतूर), बाबुराव अंबादास बावणे (60, रा. दाल फैल, खामगाव), शकील सुलतान सय्यद (45, रा. जिंतूर) या तिघांविरुद्ध 417,419,420,504,506 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भास्कर तायडे करत आहे.