न.प. कडून नियोजन नसल्याने उडाली झुंबड
शेगांव : नगर पालिकेकडून शहरातील व्यापाऱ्यांना कोविड चाचणीची सक्ती केल्याने मागील दोन दिवसात कोविड चाचणी केंदारवर व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. यामध्ये मागील दोन दिवसात १६ जणांचे अहवाल पझेटिव्ह आढळून आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढल्याने पॉझेटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये ही भरमसाठ वाढ झाली आहे. आता शेगाव नगरपालिकेने शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी कोविड चाचणीसाठी सक्ती केल्यानंतर व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेण्यासाठी केंद्रावर एकच गर्दी केली. आज बुधवारी तर केंद्रावर गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले. नगरपालिकेने चाचणी ची सक्ती केल्यानंतर शहरातील टाऊन हॉल येथे आरोग्य विभागा मार्फत चाचणी केंद्र उभारले मात्र येणाऱ्या व्यापार्यांसाठी योग्य नियोजन न केल्याने एका हॉलमध्ये दोनशे ते तीनशे लोक गर्दी करून सोशल डिस्टंसिंग फज्जा उडविते असल्याचे दिसून आले गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.