December 28, 2024
आरोग्य जिल्हा शेगांव

कोरोना वर मात करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला रुग्णालयातून सुट्टी

शेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्यात दिलासादायक म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. मंगळवारी शेगाव येथील नगर परिषदेच्या एका सफाई कर्मचाऱ्याचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्याला शेगावच्या रुग्नालयातून सुट्टी देण्यात आली. ३० वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने कोरोनावर मात केली आहे. यावेळी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी त्याला प्रमाणपत्र देऊन रुग्णालयातून सुट्टी दिली.तसेच लोणार तालुक्यातील एका ६० वर्षीय संदिग्ध महिला रुग्णाचा लोणार ग्रामीण रुग्णालयात २६ मे रोजी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्वेब नमुने घेण्यात येत आहे. त्या मृत महिलेचा मृतदेह  लोणार ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे तसेच दुसरीकडे आरोग्य विभागाच्या वतीने या संदिग्ध मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे  कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आले आहे.

२६ मे रोजी सायंकाळी या सर्व कॉन्टॅक्ट बुलडाण्यातील आयसोलेशन कक्षामध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. सोबतच चांदुर बिस्वा येथे पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या युवकाची दुसरी बहीणही करून पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. २५ मे रोजी या युवकाचे १६ वर्षीय पॉझिटिव्ह आढळून आली होती, दरम्यान २५ मे रोजी रात्री उशिरा जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या अहवालानुसार येथील आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते दरम्यान येथे आता एकूण तीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण ४६ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी ३ मृत आहेत. आतापर्यंत २७ कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २७ आहे.  सध्या रूग्णालयात १५  कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related posts

पोटच्या मुलीला आईने ढकलले विहिरीत

nirbhid swarajya

महिलावरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची ‘अवंती’ हेल्पलाईन

nirbhid swarajya

दोन ठिकाणी वीज चोरी पकडली

nirbhid swarajya
error: Content is protected !!