खामगांव : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक प्रकारच्या उपाय योजना अनेकांकडून केल्या जात आहे. अशा परिस्थितीत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आकाश फुंडकर मित्र मंडळ व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने या संसर्गातही मदतीचा हात पुढे करुन येथील सामान्य रुग्णालयातील काम करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक,व संपुर्ण स्टाफ साठी मोफत जेवणाचे दररोज ६० डब्बे पोहचविण्यात येत आहे. गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारिने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. या कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णाच्या सेवत काम करणारे डॉक्टर, परिचारिका,सफाई कर्मचारी, वेक्सिनेशन करणारे, सिटी स्कैन करणारे यांना जेवणासाठी सुद्धा वेळ भेटत नाही आहे. यामुळे सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत आकाश फुंडकर मित्र मंडळ व भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने गेले १५ दिवस या सर्वाना वेगवेगळे प्रकारचे व्यंजन व बिसलेरी अशे ६० डबे रोज देत आहे. या सामाजिक बांधिलकीचे आकाश फुंडकर मित्र मंडळ व भाजपा युवा मोर्चाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.
previous post