बुलडाणा : कोरोना विषाणू प्रादुर्भावमुळे मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत गरीब, गरजू लोकांना मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन मा. मुख्यमंत्री यांनी केले होते. त्यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अधिकारी / कर्मचारी यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून ८२ हजार रूपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली आहे.
महामंडळ समाजातील तरूणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अर्थसहाय्य देत असते. महामंडळाच्या माध्यमातून अनेक तरूण व्यावसायिक बनले आहेत. महामंडळाचे सर्व अधिकारी, कर्मचारी/ सर्व जिल्हा समन्वयक यांनी आपल्या स्वइच्छेने वेतनातून ८२ हजार रूपयांचा निधी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनातून जमा केला आहे, असे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी कळविले आहे.
सौजन्य – जिमाका