खामगांव : संपुर्ण देशभरात कोरोना ने हाहाकार माजवला असुन त्याला रोखण्यासाठी सर्व जन आपले आपले प्रयत्न करत आहेत.. असाच एक प्रयत्न खामगांव येथील अग्रवाल क्रॉकक्रीज व फेविकॉल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना सारख्या आजारापासून बचाव व्हावा यासाठी आज बारादरी भागातील अग्रवाल क्रॉकक्रीज या दुकानासमोर दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी हैंडवॉश ने हात धुण्याची व्यवस्था केली.. याचे उदघाटन संचालक मधुसुदन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले..ग्राहकाने आपले हात धुऊनच दुकानात प्रवेश करावा या साठी ही व्यवस्था केली आहे. या वेळी सुरज अग्रवाल, फेविकॉल कंपनी चे अमोल पवार,खामगांव मधील सर्व डीलर्स,तथा कर्मचारी यांच्यासह आदि उपस्थित होते.