खामगांव : कॉटन मार्केट रोडवरिल पगारिया इलेक्ट्रिकल्स व बजाज ट्रेडर्स ह्या दुकानाचे कुलुप तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या महितीनुसार सिव्हिल लाइन येथील रमेश बंसीलाल बजाज यांची कॉटन मार्केट रोडवर बजाज ट्रेडर्स असुन ७ जुलै रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुकानाचे शटरचे कुलुप तोडून दुकानात प्रवेश करुण काउंटर मधील नगदी ३० हजार रुपये चोरून नेले. तर दुसऱ्या घटनेत योगेश कांतीलाल पगारिया यांची टिळक पुतळ्याजवळ पगारिया इलेक्ट्रिकल्स दुकान आहे. पगारिया काल दुपारी ४ वा. दुकान बंद करून घरी गेले होते.
८ जुलै च्या रात्री ३ वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील डीव्हीआर व नगदी ३ ते ४ हजार रु चोरुन नेले आहे. चोरटे बाजूला असलेल्या उदिप सिस्टम च्या दुकानाच्या सीसीटीव्ही मधे कैद झाले असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तर बजाज ट्रेडर्सचे रमेश बंसीलाल बजाज यांनी सुद्धा शहर पोलिस स्टेशन मधे तक्रार दिली आहे. या दोघांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम ३८०,४५७ नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.