खामगांव : कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीसोबत लढण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाला आहे. सर्व जण आपापल्या परीने, क्षमतेनुसार यात आपलं योगदान देत आहेत. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समीती खामगाव तर्फे पंतप्रधान साह्यता निधी साठी
मदत दिली आहे. आमदार आकाश फुंडकर यांना कृषी उत्पन्न बाजार समीती खामगाव च्या वतीने पंतप्रधान साह्यता निधीसाठी ११ लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला आहे. आकाश फुंडकर यांनी तहसिलदार शितलकुमार रसाळ यांना हा चेक पंतप्रधान साह्यता निधि जमा करण्यासाठी सांगितले आहे. यावेळी भाजपा नेते सागर फुंडकर, सभापती संतोष टाले, संचालक विठ्ठलराव लोखंडकार, संचालक दिलीपजी पाटील, अशोकराव हटकर, न.प. मुख्याअधिकारी श्री.धनंजय बोरीकर, सचिव कृ.उ.बा. मुगूटराव भिषे आदींची उपस्थिती होती.
previous post