चिखली:भाजपचे कथित ‘फायरब्रँड’ नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय! चिखलीत शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून व ती पायदळी तुडवून जहाल निषेध नोंदविला. एका वृत्तवाहिनीने भाजप नेते सोमय्या यांचे आपत्ती जनक स्थितीतील व्हिडीओ प्रसिद्ध केले. याचे पडसाद दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यातही उमटले! विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक पेनड्राईवच उपसभापतींकडे सुपूर्द केला असून त्यात किरीट सोमय्या यांच्या ८ तासांच्या क्लीप असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने चिखलीत किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला. जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यामध्ये कपिल खेडेकर, विश्वास खंडागळे, प्रीतम गैची, श्याम शिंगणे, प्रलय खरात, हरी इंगळे, गजानन पवार, अशोक सुरडकर, रवी पेटकर, बंडू नेमाने, सतनाम वधवा, शंभू गाडेकर, आकाश डोणगावकर, संतोष देशमुख यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक सहभागी झाले.
अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर राजकीय लोणार विदर्भ विविध लेख शेगांव संग्रामपूर