January 6, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शेतकरी

किमान आधारभुत किंमत खरेदी योजनंतर्गत मका/ज्वारी शासकीय खरेदीचा शुभारंभ

शासकीय धान्य़ खरेदी योजनेंतर्गत उददीष्ट़ वाढवून देण्यात यावे- आ.ॲड आकाश फुंडकर

खामगांव : खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत मका/ ज्वारी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार ॲड.आकाश फुंडकर म्हणाले की, धान्य़ खरेदीबाबत ज्वारीचे १८०० क्विंटल व मक्यासाठी ७००० क्विंटल उददीष्ट़ हे अत्यल्प़ आहे. ते वाढविण्याची गरज आहे. त्याची मागणी करण्यात येईल. खामगांव येथील शासकीय गोदाम येथे आज आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबुरावसेठ लोखंडकार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक मनोहर बोराडे, विभाग प्रमुख दत्ता पाटील, गोदाम प्रमुख अमोल बाहेकर यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना आमदार ॲड.आकाश फुंडकर म्हणाले की, किमान आधारभूत किंमत योजनेंर्गत ज्वारीचे १८०० क्विंटल मक्यासाठी ७००० क्विंटल उददीष्ट़ दिले आहे ते अत्य़ल्प़ आहे. कारण दरवर्षी खामगांव येथे जवळपास १०००० ते १२००० क्विं. ज्वारी व २०००० ते २२००० क्विंटल मक्याची आवक होत असते असे असतांना देखील अत्यल्प़ उददीष्ट़ दिल्यामुळे शेतक-यांच्या जवळची ज्वारी व मक्का किमान आधारभूत किमतीत विकल्या जाणार नाही व पुन्हा शेतकरी अडचणीत सापडेल त्यामुळे सरकारने उददीष्ट़ वाढविण्याबाबत आवश्य़क पावले उचलावी व तात्काळ किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत ज्वारी व मक्याचे उददीष्ट़ वाढवून देण्यात यावे अशी मागणी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.आकाश फुंडकर यांनी केली आहे. यावेळी उपस्थित शेतक-यांचा सत्कार करण्यात आला.

Related posts

गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे नावाने होण्यासाठी २० जुलैला मुंबईत मोर्चा…

nirbhid swarajya

अनोळखी इसमाचा आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

nirbhid swarajya

पत्रकारांची कोरोना चाचणी करून ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे

nirbhid swarajya
error: Content is protected !!