कुडो खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरीत कोटा
खामगांव : महाराष्ट्र आणि भारताचे अध्यक्ष सोशिहान मेहुल वोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडो आता क्रीडा कोट्यात पूर्णपणे सामील झाला आहे. जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील डझनभर खेळाडू त्यांच्या कर्तृत्वावर केंद्र व राज्यस्तरीय नोकरीस पात्र ठरतील.अखिल भारतीय क्रीडा परिषदेने देशातील वीस क्रीडा स्पोर्ट्स कोट्यात समाविष्ट केल्या आहेत. खेळाडू आणि या क्रीडा संघटनांच्या कर्तृत्व लक्षात घेता क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे.
खेळाडूंना स्पोर्ट्स कोट्याचा समावेश करून आर्थिक लाभ सुद्धा याद्वारे मिळू शकेल. कुडो इंटरनॅशनल फेडरेशन इंडियाच्या या कर्तृत्वावर कुडो इंडियाचे शिहान अक्षय कुमार, कुडो इंडियाचे अध्यक्ष सोशीहान मेहुल वोरा आणि महाराष्ट्र कुडो फॅमिलीचे कुडो प्लेयर्स आणि कुडो इंटरनेशनल फेडरेशन इंडिया यांनी महाराष्ट्रातील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.