खामगांव : शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रॉयल चैलेंजर बैंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान काल रात्री सुरू असलेल्या सामन्या दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी महागडे मोबाईल्स, टॅबलेट, एलसीडी टीव्ही, टाटा स्काय डिश,जप्त केले. शहरातील वामन नगर परिसरातील एका घरामध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी रात्री उशिरा सदर छापा टाकला. तेंव्हा दोन जण टीव्हीसमोर राजस्थान रॉयल्स व रॉयल चैलेंजर बैंगलोर या संघादरम्यान सुरू सामन्यांवर सट्टा लावताना आढळून आले. पोलिसांनी अमरसिंग सुरेंद्रसिंग ठाकुर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दूसरा आरोपी कल्पेश बजाजहा फरार झाला आहे.
कारवाईत पोलिसांनी एक LLOYD कंपनीचा LED टिव्ही व रिमोट किं. ५० हजार रु. एक डेल कंपन्नीचा लॅपटॉप कि. २०हजार रु. , एक रेडमी कंपन्नीचा नोट 9 प्रो मोबाईल किं.१० हजार रु.
एक रेडमी कंपनीचा मोबाईल किं.१५ हजार रु. , एपल कंपनीचा आयपॅड टॅबलेट किं.४० हजार रु., एक टाटा स्कॉय कंपन्नीचा सेटॉप बॉक्स अॅडप्टर व रिमोट किं. १ हजार रु., एक CITIZEN कंपनीचा कॅलक्युलेटर कि.अं.१०० रु., एक टाटा स्कॉय कंपनीची डिश कि.५०० रु. व डायरी,पेन सह साहित्य असा एकुण १,३६ ६४५ रुपयाचा जुगार माल मिळून आला. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत ,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शन्नाखाली पो.नि. सुनिल अंबुलकर, पोउपनि. गौरव सराग, पोउपनि. ईश्वर सोळंके , नापोकाँ सुरज राठोड, नापोकाँ संतोष वाघ, नापोकाँ अनंता डुकरे, पोकाँ दिपक राठोड, पोकॉ प्रफुल टेकाळे, पोकॉ जितेश हिवाळे, पोकॉ अमरदिपसिंह ठाकुर व महिला नापोकाँ प्रिती निर्मळ, मपोकॉ मोनिका खिलोलीया पो.स्टे. खामगांव शहर यांनी केली आहे.