खामगांव : येथील लक्कडगंज भागात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने लाखोंचा गुटखा पकडल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या महितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, स्थानिक लक्कडगंज भागात एका ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवला आहे. त्या गुप्त माहितीच्या आधारे मनीष गुरुमुखदास अघिचा वय ३८ रा. लक्कडगंज याच्या घरी छापा मारला असता त्याचा घरातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तसेच मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामधे विमल पान मसाला वाह पान मसाला प्रिमियम नजर गुटखा , डब्ल्यू चिंगम टोब्याको लिहिलेली तंबाखू असा एकूण २ लाख१ हजार १९० रूपयांचा माल जप्त केला आहे.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील पोना. सुधाकर थोरात यांनी दिलेल्या फिर्यादिवरून आरोपी मनीष अघिचा याच्या विरुद्ध भादवी कलम १८८,२७२,२७३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई ही बुलडाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया,अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या आदेशाने एसडीपीओ पथकातील सपोनि रविंद्र लांडे, पो. फौ.बद्रीनाथ जायभाये, पोना सुधाकर थोरात, पो कॉ विशाल कोळी, म पो हे कॉ ज्योती धंदर,होमगार्ड आंनद हेलोडे यांनी केली आहे.