जिल्हा मुख्यालयी परवानगी नाकारल्याने प्रत्येक गावात केले आंदोलन
संभापुर/ खामगाव – उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानातील महिलांच्या आज जिला मुख्यालयी होणाऱ्या मुकमोर्चाला शासनाने परवानगी नाकारल्याने ह्या महिलांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात उमेद च्या खाजगिकरणाच्या संदर्भात सरकार च्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत एल्गार पाहायला मिळाला.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानाचे खाजगीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला असून सरकार च्या या निर्णया विरोधात आज जिल्ह्यातील लाखो महिलांचा मूक मोर्चा जिल्हा मुख्यालयी धडकणार होता मात्र कोरोनाची भीती पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्र आल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या मोर्चाची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली होती, त्यामुळे या अभियानात सहभागी महिलांनी आपल्याच गावात या सरकार च्या निर्णया विरोधात निदर्शने केलीत,खामगाव तालुक्यातील संभापुर येथील महिलांनी आपल्या हातामध्ये पोस्टर घेत गावातून मुकामोर्चा काढत सरकार चे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला दिशा देणाऱ्या या अभियानाला खाजगी संस्थेकडे वर्ग केल्यास या महिलांचा आर्थिक विकास खडतर होणार असून , राज्यातील 50 लाख पेक्षा जास्त महिलांच्या अधोगतीचा हा निर्णय सरकार ने परत घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.यावेळी कुसुम तायडे ,जयश्री गावरगुरु ,सुजाता गावरगुरु ग्राम संघातील पदाअधिकारी तसेच अंगणवाडी सेविका गावातील सदस्य उपस्थित होत्या.
राज्यात उमेद अभियानाचे जवळपास पाच लाख बचत गट, ग्राम संघ , प्रभाग संघ असून या अभियानात 50 लाख पेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या असून त्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवन सुकर होऊन समाजात एक महत्वाचे स्थान मिळाले आहे , मात्र या निर्णयाने हे सर्व मातीमोल होणार आहे त्यामुळे सरकार ने हा निर्णय मागे घेऊन गट ग्राम संघ व प्रभाग संघांना दिला जाणारा निधी वितरित करावा, अभियानातील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करावी व हे अभियान असेच सुरू ठेवावे ही आमची मागणी आहे.
-तेजस्विनी पवार