खामगाव: भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अँड आकाश फुंडकर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा महिला आघाडी तालुक्याचे वतीने सशक्त महिला संघटन सप्ताहास आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. अशी माहिती तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई गायकी यांनी दिली आहे. आज 30 जानेवारी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी यांचे वाढदिवस ते 5 फेब्रुवारी आमदार अँड आकाश फुंडकर यांचे वाढदिवस पर्यंत महिलांचे संघटनात्मक कार्यक्रम गाव तसेच जिल्हा परिषद सर्कल निहाय घेण्यात येणार आहे. भाजप महिला संघटन वाढविणे, गाव तेथे शतप्रतिशत ग्रामशाखा स्थापन करणे, फलक अनावरण, महिलांच्या तक्रारी चे निवारण करणे, गतनिर्मिती करणे, उघु उद्योग उभारणी साठी प्रोत्साहित करणे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस समस्या निवारण, प स , जि प मार्फत महिलांना वैयक्तिक लाभ योजना लाभ मिळवून देणे, जि प सर्कल निहाय मेळावे घेणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप खामगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी प स सभापती सौ उर्मिलाताई गायकी यांनी दिली आहे. सोमवार 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता भाजप कार्यालय खामगाव येथे महिलांसाठी हळदी कंकू संमेलन आयोजित करण्यात आले असून महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवहान सुद्धा सौ गायकी यांनी केले आहे.
previous post