अकोला : राज्यात लॉकडाउन सुरु होऊन तीन महिने होत आहेत. ह्या दिवसांमध्ये अनेक कलाकारांनी प्रेक्षकांशी असलेली नाळ घट्ट जुळवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाकारांसोबत इंस्टाग्राम लाइव आरजे श्री ने केले आहेत. एकही दिवस खंड न पडू देता चाहत्यांचे मनोरंजन त्याने केले. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, रैपिड फायर राउंड, ऑनलाइन लाइव टास्क ह्या सगळ्यामधे दररोज प्रेक्षक आणि पाहुणे कलाकार दोघांना ही धमाल यायची. कलाकार, अभिनेते, वॉइस ओवर आर्टिस्ट, ऑनलाइन जादूगर, विनोदी मिमिक्री कलाकार अशी अनेक मंडळीनी श्रीच्या ह्या लाइवला हजेरी लावली आहे. ह्या उपक्रमात सुप्रसिद्ध अभिनेता शिव ठाकरे, अमित्रीयान, केतकी नारायण, रूपाली भोसले, केतकी चितळे, रसिका चव्हाण, प्रणव रावराणे, सत्यपाल महाराज, ऐश्वर्या राजेश, कमलाकर सातपुते, प्रतीक्षा देशमुख, जादूगर योगेश ईत्यादीनी सहभाग घेतला. त्याच-त्याच गोष्टीचा कंटाला येऊ नये ह्या गोष्टीची खबरदारी श्रीने घेतली. ही संकल्पना कशी सूचली हे विचारल्यावर ‘मनोरंजन करणे मग ते प्रेक्षक घरबसल्या कसे जुळतील, हा विचार आल्यावर लाइव सुरु केले, मनोरंजन हीच जबाबदारी असल्याने मला खुप काही शिकायला मिळाले असे आरजे श्री ने सांगितले आहे.
previous post