November 21, 2025
अमरावती खामगाव गुन्हेगारी जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ व्यापारी शेगांव

आयपीएल सट्टावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही

शेगाव: सद्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट वर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करण्याचे अनुसंघाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून कार्यवाही करण्याच्या त्यांना योग्य त्या सुचना दिल्या.
जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंबोडा शिवारात मागील काही दिवसांपासून आयपीएलवर सट्टा बाजार सुरू होता.इंडियन प्रिमीयर लीग २०२३ क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक १३ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना आंबोळा शिवारात आयपीएल वर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी लाईव्ह मॅचवर सट्टा खेळत असल्याचे आढळून आले, मोबाईलवर IPL क्रिकेट सट्टा चालवीतांना मिळुन आले. तीन आरोपींना त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन नऊ मोबाईल,एक लॅपटॉप,एक बुलेट,एक एक्टिवा नगदी रक्कम, जुगाराचे इतर साहीत्य असा एकुण ३,४३७०० /- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन सट्टेबाज विरूद्ध पो.स्टे जलब येथे कलम १२ मु. जु.का.सहकलम १०९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक सारंग आवाड, अपर पोलीस अधिक्षक महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, पसहाय्यक पोलिस निरीक्षक विलासकुमार सानप, पोहेका.दीपक लेकुलवले,नापोका.गणेश पाटील,पोका.मनोज खरडे,पोका. सुरेश भिसे यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.

Related posts

शेगाव येथे 16 जुलै 2023 रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दर्शन सोहळा…

nirbhid swarajya

शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलन .छत्तीसगड च्या मुख्यमंत्र्यानी लावली संमेलनाला हजेरी …..

nirbhid swarajya

कोरोनाच्या भीतिने 3 महिन्यापासुन आजोबा शेतातील मंचनावर

nirbhid swarajya
error: Content is protected !!