October 6, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या ऐकास अटक

खामगाव आयपीएल सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या व खेळविणाऱ्यास स्थानिक चांदमारी भागातून अटक करण्यात आली आहे . एएसपी श्रवण दत्त यांच्या पथकाने काल रात्री ही कारवाई केली. अप्पर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांना चांदमारी भागात आयपीएल सामन्यावर सट्टा खेळविला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली . त्यावरून त्यांच्या पथकाने काल रात्री चांदमारी भागातील गजानन अंबादास ठोंबरे यांच्या घरी अचानक छापा मारला .

यावेळी ठोंबरे हा आयपीएल स्पर्धेतील गुजरात व बैंगलोर या सामन्यावर सट्टा खेळतांना व खेळवितांना मिळून आला . याप्रसंगी पोलिसांनी ठोंबरे यास अटक करून त्याच्या ताब्यातून ४ मोबाईल व इतर साहित्य असा १३,३०० रू . चा मुद्देमाल जप्त केला . याप्रकरणी त्याच्याविरूद्ध शहर पोस्टेला कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे . ही कारवाई एएसपी श्रवण दत्त यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळ , पोहेकॉ . गजानन बोरसे , नापोकॉ गजानन आहेर , संदीप टाकसाळ , राम धामोडे , अनिता गायकी , निर्गुंना सोनटक्के यांनी केली .

Related posts

Why Bold Socks Are The ‘Gateway Drug’ To Better Men’s Fashion

admin

फिजिकल डिस्टन्सिंगसाठी छत्री पॅटर्न

nirbhid swarajya

शेगाव अनिल बिचकुले ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर…

nirbhid swarajya
error: Content is protected !!