बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 41 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 38 अहवाल कोरोना निगेटीव्ह, तर 3 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये रायगड कॉलनी, बुलडाणा येथील 24 वर्षीय तरूण, सावरगांव जहाँ ता. मोताळा येथील 35 वर्षीय पुरूष आणि येरळी ता. नांदुरा येथील 39 वर्षीय पुरूष आहे. सावरगांव जहाँ ता. मोताळा येथील तरूणाचा मुंबई प्रवास इतिहास आहे. तसेच येरळी ता. नांदुरा येथील पुरूषही मुंबई येथून आलेला आहे. मात्र सदर व्यक्तीला नांदुरा येथील आयटीआय येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे बुलडाणा येथील युवक हा फिलीपाईन्स येथून आलेला आहे. तसेच आव्हा ता. नांदुरा येथील एका 24 वर्षीय रूग्णाला आज कोविडचे मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षणे नसल्यामुळे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 1053 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 53 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 29 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 29 आहे. सध्या रूग्णालयात 21 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज 28 मे रोजी 41 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 38 निगेटीव्ह, तर 3 पॉझीटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 91 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1053 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
ReplyForward |