October 5, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

आज जिल्ह्यात प्राप्त 131 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 17 पॉझिटिव्ह

10 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटदद्ववारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 148 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 131 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 80 तर रॅपिड टेस्टमधील 51 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 131 अहवाल निगेटीव्ह आहेत.पॉझीटीव्ह अहवालामध्ये रामनगर नांदुरा येथील 33 वर्षीय पुरूष, बारादरी मलकापूर येथील 32 वर्षीय महिला, मलकापूर येथील 25 वर्षीय पुरूष, इकबाल चौक बुलडाणा येथील 43 वर्षीय पुरूष, सुरभी कॉलनी शेगांव येथील 22 वर्षीय पुरूष, दाल फैल खामगांव येथील 35 व 47 वर्षीय महिला, टिपु सुलतानपूरा शेगांव येथील 26 वर्षीय पुरूष, आळसणा ता. शेगांव येथील 16 वर्षीय मुलगा, शेलूद ता. चिखली येथील 62 व 45 वर्षीय महिला, 19 वर्षीय मुलगा, चिखली येथील 21वर्षीय पुरूष, तसेच सिनगांव जहागीर ता. दे. राजा येथील 45 वर्षीय पुरूष, जुना जालना रोड दे. राजा येथील 48 वर्षीय पुरूष, शेगांव रोड खामगांव येथील 55 वर्षीय पुरूष व नॅशनस हायस्कूलजवळ खामगांव येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 17 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 10 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये पारपेठ मलकापूर येथील 8 वर्षीय मुलगा, अमोना ता. चिखली येथील 30 वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं.राजा येथील 10 वर्षीय मुलगा, 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, मुळ पत्ता देऊळगाव ता जामनेर जि. जळगांव येथील 65 वर्षीय महिला, शक्तीनगर मलकापूर येथील 75 वर्षीय पुरूष, नांदुरा येथील 28 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 3560 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 215 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 215 आहे.आज रोजी 219 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2698 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 377 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 215 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 147 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 15 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क,सॅनिटायजर, हॅन्डवाॅशचे वाटप

nirbhid swarajya

30 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

nirbhid swarajya

हिंदुस्तान लिवर कामगार संघटनेची निवडणुक पडली पार

nirbhid swarajya
error: Content is protected !!