संपूर्ण जगभर आजचा ३ मे दिवस ‘प्रेस फ्रिडम डे’ (वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन) म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्व देशांमधील सरकारे, सत्ताधारी आणि राजे या सर्वांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्व कायम लक्षात राहावे यासाठी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
आफ्रिका खंडातील पत्रकारांनी नामीबियातील विंडहोकमध्ये २८ एप्रिल ते ३ मे १९९१ या कालावधीत झालेल्या परिषदेत वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. माध्यमांचे स्वातंत्र्य, विविधता आणि बाह्य हस्तक्षेपापासून मुक्तता ही तत्त्वे त्याच्या केंद्रस्थानी होती. या दिवसाचे स्मरण म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने १९९८ पासून ३ मे हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली. त्यानिमित्ताने माध्यमांचे स्वातंत्र्य, पत्रकारांची सुरक्षितता आदी विषयांवर जगभर चर्चा होते. दर वर्षी या दिवशी वेगवेगळ्या देशात वृत्तपत्र स्वातंत्र्य विषयक थीमवर परिषद भरवली जाते. जागतिक प्रेस स्वातंत्र्य परिषद यावेळी नेदरलँड्सने २२ ते २४ एप्रिल दरम्यान हेगमध्ये जागतिक प्रेस स्वातंत्र्य परिषद (डब्ल्यूपीएफसी) आयोजित करण्याची योजना आखली होती परंतु, कोविड -१९ च्या संकटामुळे परिषद पुढे ढकलण्यात आली असून आता ती १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत होणार अशी माहिती आहे.
previous post
next post