November 20, 2025
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ सामाजिक

आजची स्त्री सर्व क्षेत्रात अग्रेसर – ऍड. जयश्रीताई शेळके

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने खामगाव येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

खामगाव : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे.आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.आज प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडविणारे हात हे महिलांचे आहेत,याचा अभिमान वाटतो.आजची स्त्री आत्मविश्वास आणि शिक्षणाच्या बळावर सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ऍड जयश्री शेळके यांनी व्यक्त केले.जयहिंद लोकचळवळीच्या वतीने खामगाव येथे महिलादिनानिमत्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या..जयहिंद लोकचळवळीच्या वतीने खामगाव येथे महिलादिनानिमत्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सिमाताई ठाकरे पाटील होत्या. तर विचारमंचावर जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ रंजना ताई घिवे, जयहिंद लोकचळवळीचे बुलडाणा जिल्हा समन्वयक स्वप्नील ठाकरे पाटील, डॉ.सुरेखा मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार पर्ण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरवात झाली.प्रास्तविक यांनी केले. त्यानंतर मान्यवर महिलांची भाषणे झाली. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्या कर्तृत्ववान महिलांचालोकचळवळीच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यांनी सुद्धा अनुभवपर मनोगत व्यक्त केले.पुढे बोलताना जयश्रीताई शेळके म्हणाल्या की ,आजची स्त्री ही सर्व क्षेत्रात अग्रेसर असून, महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या संधीचे सोने त्यांनी केले. यामुळेच महिलांनी आपले वेगळेपण सिद्ध करून दाखविले. भारतात पूर्वी मातृसत्‍ताक कुटुंबपद्धती होती. आजची स्त्री आत्मविश्वास आणि शिक्षणाच्या बळावर सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. म्हणूनच ती आव्हानात्मक क्षेत्रातदेखील सहजतेने वावरताना दिसतेय, त्यामुळे स्त्रियांना आता आपले कर्तृत्व सिद्ध करत राहावे,समाजात वावरताना स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे, असेही जयश्री ताई म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन सौ. भाग्यश्री देशमुख आभार प्रदर्शन सौ. मीनल ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास शेकडो महिला उपस्थित होत्या.
कर्तृत्त्वान महिलांचा सन्मान
जयहिंद लोकचळवळीच्या वतीने महिलादिनानिमत्त राजकारण, समाजकारण, आरोग्य, उद्योग, नोकरी व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यात सौ. शिल्पा गणेश ताठे सरपंच, माक्ता कोक्ता,सौ. प्रभावती रवींद्र धुरंधर, सरपंच आमसरी, सौ. मंगला डिगांबर बेलोकार,उपसरपंच, सुजातपूर,सौ. उषा विठ्ठल थेरोकार, सरपंच लांजूड ,सौ. शारदा जितेंद्र खंडेराव, सरपंच दौंडवाडा,सौ.वर्षा दिनेश इंगळे, सरपंच,सुटाळा बु.,सौ.राजश्री पाटील ,सौ.कोमल तायडे , सौ. शितल दारमोडे, सौ. सुधा भिसे ,सौ. रजनी भालेराव ,सौ. अंजूताई झिने, सौ. संगीता खरचने ,कु. वर्षा मेतकर ,सौ. भाग्यश्री देशमुख सौ. स्नेहलताई वरणगावकर , सौ शुभांगी घिवे, सौ. वैष्णवी देशमुख,,सौ. वैशाली मुजुमले, सौ. सुलोचना वानखडे, सौ. सुजाता उबाळे ,सौ. वनिता चव्हाण ,सौ.शोभाताई बर्डे, श्रीमती नीताताई बोबडे, सौ.सविता देशमुख, रहीना खान याना सन्मानित करण्यात आले.

Related posts

उत्तर प्रदेश मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा- ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

nirbhid swarajya

सैनिकांसाठी प्रॉपर्टी संदर्भात विनामूल्य सेवा

nirbhid swarajya

घरासमोरुन बकऱ्या गेल्या चोरी

nirbhid swarajya
error: Content is protected !!