पोलीस स्टेशन वर रोषणाई तर पोलिसांनी फटाके फोडून केला आनंद साजरा
चिखली : जिल्ह्यातील चिखली येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील दोन्ही नराधमांना आज जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी विविध कलमान्वये फाशीची शिक्षा सुनावल्याने पीडितेला न्याय मिळालाय न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातुन स्वागत करण्यात येत असून आरोपीना फाशीची शिक्षा मिळण्याची कदाचित ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी,तर विशेष म्हणजे ज्या चिखली पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला आणि आरोपीना शिक्षा होईपर्यँत न्यायालयात पीडितेला न्याय मिळण्यासाठी भक्कम पुरावे सादर केले , त्या चिखली पोलीस स्टेशन मधील पोलिसांना हि आनंद झाला आणि त्यांनीही पोलीस स्टेशन वर रोषणाई केली आणि फटाके फोडून आनंद साजरा केलाय यामुळे पोलीस स्टेशन परिसर झगमगाट दिसत आहे .
मागील वर्षी 26 एप्रिल 2019 रोजी रात्री ९ च्या सुमारास चिखली शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या आई-वडिलांसह झोपलेल्या नऊ वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर दोघं नराधमांनी अत्याचार करण्यात आले होते,रात्री पेट्रोलिंगवर असणार्या पोलिसांना ती चिमुकली जखमी अवस्थेत दिसून आल्यावर प्रकार समोर आला. या घटनेनंतर चिखली शहर एकत्रित येऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत होते. एक दिवस चिखली बंद पुकारण्यात आला होता. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती.या निंदणीय घटनेचा तपास अत्यंत गंभीरतेने करीत चिखली पोलीसांनी अल्पकालावधीतच आरोपी निखिल गोलाईत आणि सागर बोरकर याना न्यायालयाकडून फाशीची शिक्षा मिळविली. त्यामुळे चिखली पोलीसांनी देखील काल पासून पोलीस स्टेशनवर विदयुत रोषनाई केलीय .