April 16, 2025
आरोग्य गुन्हेगारी जिल्हा महाराष्ट्र मुंबई राजकीय शेगांव

अर्धवट डिग्री लिहून रुग्णांची डॉक्टरांकडून दिशाभूल

आयएमए कडून कारवाई करण्याची मागणी

आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल

शेगाव : शहरातील काही डॉक्टर्स आपली खरी डिग्री लपवून नियमांची पायमल्ली करीत रुग्णांची दिशाभूल होईल या उद्देशाने फलकावर अर्धवट डिग्री दर्शवित असल्याची तक्रार इंडियन मेडिकल असोशिएशन (आयएमए) म्हणजेच एमबीबीएस एमडी असलेल्या डॉक्टरांच्या संघटनेने नुकतीच आरोग्य विभागाकडे केली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा शेगाव च्या वतीने शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीकाकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे कि, कोणत्याही पॅथीच्या डॉक्टरी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्याच्या फलकावर आणि प्रिस्क्रिप्शन पॅडवर तसेच रुगांसाठी असलेल्या वेटींग हॉल इथे ठळक अक्षरात स्वतःच्या पॅथी व डिग्री बाबत सविस्तर माहिती लिहिणे आवश्यक असतांना शेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर तुकाराम आढाव व डॉक्टर जोहेब पटेल हे आयर्वेदिक डॉक्टर असतांना ऍलोपॅथी असल्याची जाहिरात करीत आहेत शिवाय डॉक्टर तुकाराम आढाव यांनी तर आपल्या फेसबुक पेजवर आपण MBBS असल्याचे जाहीर केले असल्याचा आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत आरोप असलेल्या डॉ. तुकाराम अढाव यांची बाजू जाणून घेतली असता ते म्हणले कि, माझ्यावरील आरोप चुकीचे असून हॉस्पिटल साठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन मी माझा वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. तर दुसरे डॉक्टर डॉ जोहेब पटेल निवेदनात आक्षेप घेतलेले मुद्दे निकाली काढले असून फार्कावर दुरुस्ती करण्यात आल्याचे त्यांनी निर्भिड स्वराज्यशी बोलतांना सांगितले.

Related posts

मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊन मधून तुर लंपास

nirbhid swarajya

जनुना येथील ते चार जण निगेटिव्ह

nirbhid swarajya

घरपोच बि बियाणे, खत सुविधेची प्रतीक्षा

nirbhid swarajya
error: Content is protected !!