April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध योग्य ती कायदेशिर कार्यवाही करावी- राष्ट्रवादीची मागणी

खामगांव : अभिनेत्री कंगना राणावत हीच्यावर योग्य ती कारवाई करणे याकरिता राष्ट्रवादीच्या वतीने शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कंगना राणावत हिने एका वृत्तवाहिनिला दिलेल्या मुलाखतीमधे सांगितले की, ” देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले. १९४७ मध्ये तर भिक मिळाली होती असे अक्षम्य वक्तव्य नुकतेच केलेले होते. तसेच पुन्हा कंगना राणावत हिने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल ” महात्मा गांधी हे सत्तेचे भुकेले होते व चालाख होते तसेच महात्मा गांधीची इच्छा होती की भगतसिंग यांना फाशी कायला हवी “असे अत्यंत बेजबाबदारपणे अक्षम्य व्यक्तव्य केलेले आहे. यामुळे सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या असून सदर तथाकथित अभिनेत्रीवर भारतीय दंड विधानाच्या तरतुदीनुसार देशद्रोहाचे व इतर गुन्हे दाखल करण्यात यावा इंग्रजांनी भारत देशावर १९४७ च्या आधी १५० वर्षे राज्य केले. इंग्रजांनी आपल्या १५० वर्षाच्या राज्यकारभारात देशातील नागरिकांवर अनन्वीत अत्याचार केले. त्यांच्या ह्या जुलमी राजवटी विरोधात त्यावेळी भारतातील अनेक ज्ञात अज्ञात देशभक्तांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यसाठी बलीदान केले, तसेच स्वतःच्या कुटंबाची पर्वा न करता प्राणाची आहुती दिली . असे असताना कंगना राणावत हिने अत्यंत बेजबाबदारपणे अक्षम्य असे जे स्वातंत्र्य मिळाल्याच्या बाबतीत व राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या बाबतीत व्यक्तव्य केलेले आहे ते अत्यंत चिड आणणारे असून त्यामुळे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या व देशासाठी बलीदान देणाऱ्या देशभक्तांचा अपमान झालेला आहे. कंगना राणावत हिने याआधीसुध्दा अशा प्रकारचे बेजबाबदार व राष्ट्रविरोधी वक्तव्य अनेक वेळा केलेले आहे. तिच अशा प्रकारचे विचार हे देशातील लोकशाहीसाठी घातक असून देशाच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. तिचे वक्तव्य हे राष्ट्रविरोधी वक्तव्य असून , देशातील नागरिकांच्या सुध्दा भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे तिच्यावर भारतीय दंड विधानाच्या तरतुदीनुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात याकरीता खामगांव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांना खामगांव राष्ट्रवादी तर्फे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर राष्ट्रवादीचे अंबादास पाटील, देवीदास गोतमारे, मोहन खताळ, राजेंद्र धनोकार, प्रकाश हेड परीक, गणेश मानें, गजानन टिकार, मीरा बाविस्कर, रविकांत माहुलीकर यांच्यासह आदिंच्या सह्या आहे.

Related posts

“पैगंबर सर्वासाठी’ मधून उभारणार सामाजिक चळवळ

nirbhid swarajya

एमआयडीसी मधून तुर कट्टे चोरी प्रकरणातील ७ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

nirbhid swarajya

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत चि.हिमांशु वनारे राज्यातून ६२ वा मेरिट

nirbhid swarajya
error: Content is protected !!