खामगाव : शासकीय धान्य वितरणाच्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पत्नी व मुलगा ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी खामगाव – मोताळा रोडवरील उमरा फाट्याजवळ घडली. मृतकामध्ये ८ वर्षीय चिमुरड्याचा समावेश आहे. मोताळा येथील राजू शामराव मिरटकर वय ४० हे आपल्या पत्नी सौ.विमल वय ३६ व मुलगा रोशन वय ८ असे तिघे जण दुचाकीने खामगावकडे येत होते. दरम्यान मोताळा येथे शासकीय वितरण प्रणालीचे धान्य घेवून ट्रक क्रमांकम एच ३१ सी बी ६७५५ मोताळ्याकडे जात होता. या ट्रकने दुचाकी क्रमांक एम एच २९ झेड ५५४१ ला पिंपळगावराजा नजिक च्या उमरा फाट्याजवळ धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मिरटकर कुटुंब फेकल्या गेले. यामध्ये सौ.विमल व ८ वर्षीय मुलगा रोशन हे मायलेक जागीच ठार झाले तर राजू मिरटकर हे गंभीर जखमी झाले. नंतर पोलीस पाटील अंभोरे यांनी घटनास्थळी पोहचून पोस्टे गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान ट्रक चालक पिंपळगाव राजा येथील असल्याचे समजते.जखमींवर सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचार सुरु आहे.या प्रकरणी पोलिसांनी पी. राजा पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करून ट्रक जप्त करण्यात आला आहे.
previous post
next post