बुलढाणा जिल्ह्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा
कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा
बुलढाणा : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेच्या होमटाऊन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिव्हीरचा इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे बोललं जात आहे. गेल्या दोन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शहरात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. राज्यात अचानकपणे रुग्णवाढल्याने पुन्हा रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्ण, डॉक्टर, हॉस्पिटलसह सरकारलाही या इंजेक्शनसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे, असा आरोप खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ऍड.आकाश फुंडकर यांनी केला आहे. तिकडे शेगावात तर रेमडेसिव्हीर इंजेक्शन मेडिकलवाल्याकडे असून हि दिल्या जात नसल्याने रुंगांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री ना.शिंगणे आणि शेगाव तहसीलदार यांना रात्रीच्या वेळेस फोन करून मदत मागितली. यांनतर सदर रुग्नाला रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळाले. बुलढाणा जिल्ह्यात एकूण २३ खासगी कोविड रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहे. या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणेंचे बुलढाणा हे होमटाऊन असून जिल्ह्याचे पालकत्वही त्यांच्याच कडे असतनाही या जिल्ह्यात रुग्णांना इंजेक्शन साठी भटकावे लागत आहे. शेगावात तर मागील दोन दिवसांपासून रुग्नांना हे इंजेक्शन दिल्या गेले नाही.